शहर

नातेपुते बस स्थानक अत्याधुनिक करण्याची गरज

बी.टी.शिवशरण

नातेपुते:माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील सातारा पुणे बारामती पंढरपूर साठी जाणाऱ्या प्रवाश्याना महत्वाचे बस स्थानक म्हणून नातेपुते बस स्थानक ओळखले जाते सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रवाशांची गरज म्हणून बांधलेले नातेपुते येथील बस स्थानक आज दुरावस्थेत व मोड कळीला आलेलेले पहायला मिळते नातेपुते ही या भागातील मोठी बाजारपेठ म्हणून दळणवळण असलेले शहर आहे.

सुमारे वीस पंचवीस खेडी गावे यांचा जनसपंर्क येथे असतो शिवाय बारामती सातारा पुणे पंढरपूर अकलूज वालचंदनगर ला जाण्यासाठी येण्यासाठी मोठया प्रमाणात प्रवाशी वाहतूक होत असते गाव वाढली शहर सुधारली प्रवाशी संख्या वाढली मात्र नातेपुते बस स्थानक आहे त्या अवस्थेत मोडकळीला आलेले पहायला मिळते.

पावसाळ्यात छत गळते आतील फरशी तुटली आहे बाकडे मोडली आहेत बस स्थानक आवारात खड्डे पडले आहेत सार्वजनिक स्वछतागृह कमालीचे अस्वच्छ आहे परिसरात दुर्गधी पसरली आहे एवढी वाईट परिस्थिती असतानाही कोणी लक्ष देत नाही आमदार राम सातपुते यांनी विशेष लक्ष घालून आधुनिक काळा प्रमाणे सर्व सुविधा असलेले नातेपुते बस स्थानक उभारण्या साठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button