मार्डी, ता.लोहारा जि. उस्मानाबाद येथे रमजान ईद उत्साहाने साजरी

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
मार्डी ता.लोहारा जि. उस्मानाबाद येथे रमजान ईद मोठ्या भक्ती भावाने व उत्साहाने साजरी करण्यात आली या ईद ची नमाज इदगाहवर परिसरातील मुस्लिम ंबांधवांनी पठण केली या नमाज नंतर मार्डी येथे असलेली सुप्रसिध्द औलिया हजरत ख्वाजा जैनुद्दीन चिश्ती समरकंदी (र.अ) यांच्या दर्गाहवर या पंचक्रोशीतील हिंदु-मुस्लिम बांधवांनी हजरत ख्वाजा साहेब यांच्या मजार जवळ फातिहा ख्वानी करुन फुलाची चादर अर्पण केली व उपस्थित सर्वांनी ख्वाजा साहबा यांचे दर्शन घेऊन देशात सुख शांती नांदो अशी प्रार्थना केली .

याप्रसंगी मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस- पापुलवार ,बीट अमलदार- सतीश माळी ,मार्डी गावचे सरपंच -श्रीमंत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष- प्रफुल्ल पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन- प्रवीण पाटील, तसेच ग्रामपंचायत व विकास सोसायटीचे सर्व सदस्य आणि मार्डी गावातील ग्रामस्थांनी एकमेकांना आलिंगन देऊन गळाभेट करून शुभेच्छा दिल्या तसेच मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना अक्षय तृतीया निमित्त शुभेच्छा दिल्या एकूणच हा प्रसंग सर्वधर्मसमभावाने ओतप्रोत भरलेला होता शेवटी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र बसून शीरखुर्मा व गुलगुले याचा आस्वाद घेतला.



