अकलूज येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

लक्ष्मीकांत कुरुडकर.अकलूज(प्रतिनिधी) अकलूज
येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन महादेव मंदिर येथे करण्यात आले बसवेश्वर चौक येथे बसवेश्वरांच्या पुतळ्याचे पूजन व अभिषेक पुष्पवृष्टी समाजाच्या वतीने करण्यात येऊन महाआरती करण्यात आली यावेळी आ. रणजीत सिंह मोहिते पाटील माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील,शिवतेज सिंह मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील,धैर्यशील मोहिते पाटील यांनी बसवेश्वरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी समाजाचे अध्यक्ष अशोक शेटे, उपाध्यक्ष विलास क्षीरसागर, नागेश लिगाडे,नितीन आर्वे,त्रिंबक (तात्या) गुळवे,कुंभार समाजाचे अध्यक्ष अमित कुंभार,शिव निर्णय संघटनेचे उत्कर्ष शेटे,मंगेश शेटे यांच्यासह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

सायंकाळी श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक अकलूज शहरातून काढण्यात आली मिरवणुकीचा शुभारंभ वेळापूरचे शिवाचार्य श्री गुरु मुक्तेश्वर महाराज व माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते पूजन करून शुभारंभ करण्यात आला यावेळी समाजाचे श्री अमृत व सौ भाग्यश्री हांडे या उभयतांना आरतीचा मान मिळाला यावेळी अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिव पूजे अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे सामाजिक कार्यकर्ते उदय शेटे, संदीप कुंभार,जगदीश स्वामी पिंटू वैद्य,चंद्रकांत शेटे,उमेश शेटे उपस्थितीत होते.
या वर्षी प्रथमच बसवेश्वर महाराज याची जयंती मोठ्या प्रमाणावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत हजारो महिला पुरुषांसह युवकांनीही मोठा सहभाग घेतला होता तसेच मुस्लिम बंधू ही सहभागी झाले होते.महिलांचे ढोलीबाजा पारंपरिक खेळ लेझीम पथक घोडेस्वार हे मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले

मिरवणूकमध्ये महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्था ढोल-ताशा पथक सहभागी झाले होते,प्रथमच लिंगायत समाजातील महिला यांनी प्रशिक्षण घेऊन ढोल ताशा आकर्षक रितीने मिरवणुकीत सादर केला.वीरशैव लिंगायत समाज बांधव यांचे लेझीम पथक आपली कला सादर केली असून याचे नियोजन शिवनिर्णय संघटना यांनी केले आहे. मिरवणूक अकलूज मधील प्रमुख मार्गावरून महादेव मंदिर येथे मंदिरामध्ये विसर्जित करून आरती व पूजन करण्यात आले.मिरवणूक समाप्ती नंतर महाप्रसाद महादेव मंदिर येथे वाटप करण्यात आला.



