शहर

बहुजन ब्रिगेड संघटनेची बैठक.. प्रवेश…सत्कार कार्यक्रम संपन्न…..

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ साठे यांच्या उपस्थितीत आणि अध्यक्षतेखाली अकलूज येथील विश्रामगृह येथे संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संघटनेचा वर्धापनदिनानिमित्त जाहीर मेळावा घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील बापू वाघमारे,दहिगाव शाखा अध्यक्ष सचिन खिलारे,संजय धाइंजे,बुलेट किंग पप्पू मिसाळ,राजू आडगळे,सागर आडगळे,आदित्य काकडे,आशुतोष फिरमे,बाळू मिसाळ,हनुमंत लांडगे,आनंद मिसाळ,तसेच रुक्मिणी रणदिवे उपस्थित होते.

इस्लामपूर येथील सुग्रीव गोरड यांचा संघटनेत प्रवेश घेण्यात आला तसेच कुस्तीच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे सराटी तालुका इंदापूर येथील तालमीतील पैलवान रणजित उर्फ सर्जा कांबळे यांच्यासह आणखी दोन आणि अकलूजमधील हनुमान तालमीतील पैलवान कृष्णा उर्फ टक्या लोखंडे यांचा आणि त्यांचे वडील विठ्ठल कांबळे,सोमनाथ लोखंडे यांचा सत्कार किरण भाऊ साठे यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button