शहर

ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी. शिरखुर्मा गुलगुलेचा प्रसाद, आलिंगन देऊन दिल्या शुभेच्छा.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, 8378076123

मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद ( ईद-उल-फितर ) परिसरात सामुहिक नमाज पठण, एकोपा, भाईचारा पाळत साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना आलिंगन देत गोड शिरखुर्मा व गुलगुले चारून तोंड गोड करण्यात आले.

पिंपरी बुद्रुक येथे मौलाना तय्यब शेख यांच्या पाठीमागे समाज बांधवांनी नमाज पठण केले. यावेळी मौलाना तय्यब शेख यांनी उपस्थित समाज बांधवाबरोबर सर्वांच्या भल्यासाठी सामुहिक प्रार्थना केली. बावडा येथे मौलाना अब्दुल मिर्जा यांनी समाज बांधवांना नमाज पठण केले. यावेळी परीसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लुमेवाडी येथील ईदगाह मैदानावर हाफीज मोहंमद अफरोज रजा यांनी नमाज पठण करून उपस्थित समाज बांधवांना नमाज व कुराणचे महत्व विषद केले. तसेच हाजी हाफीज फत्तेह मोहंमद जोधपूरी बाबा यांच्या दर्गाहमध्ये समाज बांधवांनी सामुहिक प्रार्थना केली. देश व मानव जातीच्या कल्याणासाठी व उत्कर्षासाठी शांतता राखत काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

नरसिंहपूर परिसरात मुस्लिम बांधवांनी सर्व धर्मातील नागरिकांना शिरखुर्मा व गुलगुलेचा फराळ देवून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तर आमदार दत्तात्रय भरणे, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रशांत पाटील, महादेव घाडगे, महारूद्र पाटील, श्रीमंत ढोले, संग्रामसिंह पाटील, सुनिल झेंडे, सुरेश जकाते, दिपक शिंदे, राजेंद्र कवडे देशमुख, बाळासाहेब सुतार, संदिप मोहीते, मुजमिल तांबोळी आदि मान्यवरांनी दैनिक सकाळ बातमीदार शौकत तांबोळी यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भेट देवून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button