इंदापूर बाजार समिती राज्यात नावारूपाला आणणार – जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे

इंदापूर प्रतिनिधी एस. बी. तांबोळी,
मोबाईल – 8378081147
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात नावारूपाला आणून व नावलौकिक मिळवण्यासाठी योग्य विचारांची माणसं, योग्य कारभार व चांगला सहकार चालावा यासाठी आम्ही एकत्र आल्याचे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी केले.
नीरा नरसिंहपूर येथील एवन मंगल कार्यालयात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय निंबाळकर होते. यावेळी प्रशांत पाटील, मधुकर भरणे, दत्तात्रय फडतरे, विलास माने, श्रीमंत ढोले, प्रताप पाटील, देवराव जाधव, भरत शहा, भाऊसाहेब सपकाळ, कांतीलाल झगडे, हनुमंत कोकाटे, विजय शिंदे, बाळासो करगळ, सुरेश शिंदे, उस्मान शेख, प्रदिप जगदाळे, नरहरी काळे, दादासो क्षिरसागर, हरीदास घोगरे, श्रीकांत बोडके, शिवाजी शिंदे, अमर जगदाळे, आण्णा काळे, अभिजीत तांबीले आदि मान्यवर उपस्थित होते.

आप्पासाहेब जगदाळे पुढे म्हणाले, माजी खासदार शंकरराव पाटील भाऊ यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून मार्केट कमिटी स्थापन केली. त्याच पध्दतीने चांगले कामकाज व्हावे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून योग्य विचारांची माणसे बरोबर घेतली आहेत. मागच्या वेळेस कोरोना काळात ठप्प झालेले कामकाज पुर्ववत करण्यासाठी खिशातील पैसे घालण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे. पेट्रोल पंपामुळे काही प्रमाणात काम नफ्यात सुरू आहे. मागील कार्यकारीणीतील ८० टक्के लोकांना पुन्हा संधी द्यावी लागली आहे. प्रचारासाठी वेळ खुपचं कमी असल्याने कार्यकत्यांनी मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
अध्यक्षस्थानावरून संजय निंबाळकर म्हणाले, आप्पासाहेब जगदाळे यांनी निस्वार्थी व लोकाभिमुख कारभार करून मार्केट कमिटी नावारूपाला आणली आहे. भविष्यात शेतकरी हितासाठी कामकाज करण्यासाठी सर्व पक्षीयांचे चांगल्या नेत्यांचा समावेश असणारे पॅनल तयार करण्यात आले असून सभासदांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करावे. शेतकऱ्यांचे हित न पाहता स्वहित पाहणाऱ्यानी ंं सभासदांच्या अंगी निवडणूक लादली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पाटील यांनी केले. यावेळी विलास माने, प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, हनुमंत कोकाटे, अंकुश जाधव, भाऊसाहेब सपकाळ, कांतीलाल झगडे आदिंची भाषणे झाली. तत्पूर्वी श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात सर्व उमेदवार, मान्यवर नेते यांच्या हस्ते आरती व पुजा करण्यात आली. त्यानंतर नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. सुरूवातीला सर्व उमेदवारांचा परीचय करून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन सपकाळ यांनी केले. तर आभार सागर मिसाळ यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
चौकट- विरोधी पक्ष नेते अजित पवार खासदार सुप्रियाताई सुळे यांनी बाजार समिती बिनविरोध करण्यासाठी आदेश दिले होते परंतु त्यामध्ये यश आले नाही विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार्यातून आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलची स्थापना करून निवडणूक लढवली जात आहे.



