लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतून शिवसेनेची नव्याने सुरुवात करून प्रस्थापितांना हटवून सर्वसामान्य कार्यकर्ता ला ताकद देवू – माजीमंत्री विजय शिवतारे यांचे उद्गार.

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल- 8378076123
- श्री लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतून बाळासाहेबांच्या शिवसेनेची नव्याने सुरुवात करून प्रस्थापितांना हटवून सर्वसामान्य कार्यकर्ताला ताकद देवून उभा करण्याचे काम यापुढे करण्यात येईल असे माजी राज्यमंत्री व शिवसेना नेत विजय शिवतारे यांनी केले.
नीरा नरसिंहपूर ( ता. इंदापूर ) येथील श्री लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत बाळासाहेबांची शिवसेना शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, युवासेना तालुका प्रमुख आण्णा काळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे, पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे, बारामती लोकसभा संपर्कप्रमुख ॲड गीतांजली ढोणे, महिला जिल्हाप्रमुख सीमाताई कल्याणकर, भाऊसाहेब आंदळकर आदिंच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विजय शिवतारे पुढे म्हणाले की, यापुर्वीही शिवसेनेची कामगिरी जेमतेमच असायची परंतू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना धन्युष्यबाणावर पुढच्या काळामध्ये लाखोंच्या मताधिक्याने मजल मारेल. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आहे. महारुद्र पाटलांसारखा हिरा इंदापूर तालुक्याला मिळाल्यामुळे कामे जोमाने काम मार्गी लागतील. महारुद्र पाटील व अशोक घोगरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल मार्केट कमिटीचा निवडणुकीत निवडून द्यावे. शेतकऱ्यांसाठी पुढील काळात मार्केट कमिटीत बदल घडवू असे आश्वासन शेवटी विजय शिवतारे यांनी दिले.

तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील म्हणाले इंदापूरची जनता प्रस्थापितांना वैतागलेली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पुरंदर तालुक्यापेक्षा ज्यादाचे मताधिक्य इंदापूर तालुक्यातून देऊ. विजय शिवतारेंच्या माध्यमातून इंदापूर तालुक्याला निधीची कमतरता भासणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवासेना प्रमुख अण्णा काळे यांनी केली. शिवसेनेची शाखा उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष रूपचंद जाधव, संतोष मोरे, सागर इंगळे, विजय सरवदे, नितीन सरवदे, गौरव जगदाळे, नानासाहेब काळे, सोनू मोरे, इरफान शेख, लखन जाधव, सचिव क्षीरसागर, सचिन कदम, धनंजय पवार, गणेश जगदाळे, राहुल माने, अमोल काळे, सुधीर क्षीरसागर, अक्षय निकम, विकी मगर, संतोष घुले, विनोद मोहिते, मायप्पा घोडके, बाळू हावळे, अतुल घोगरे, बापू जाधव, किशोर कोळी, गणेश जाधव, विठ्ठल धोत्रे, देवाभाऊ सरवदे, सोमा काळे, रोहित साळुंखे, मदन सरवदे, आदी मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



