महाराष्ट्र

महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक हे दि. 17 एप्रिल रोजी नोंदणी महानिरीक्षक पुणे यांची भेट घेणार

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 97 30 867 448

धुळे महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखक यांचा दि. 8/4/2023 रोजी धुळे येथे राज्यस्तरीय मेळावा संपन्न झाला. सदर मेळाव्यामध्ये अनेक महत्वाचे ठराव करण्यात आले व आमच्या मागण्या आपल्या दरबारी व शासन दरबारी मांडण्याचे ठरले आहे. त्यानुसार सोमवार दि. 17 एप्रिल रोजी नोंदणी महानिरीक्षक पुणे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा करुन निवेदन देण्यात येणार आहे.

मागण्या खालील प्रमाणे
1) मुद्रांक विक्रेत्यांना अल्प प्रमाणात मनौती मिळत आहे. त्यात उदरनिर्वाह चालविणे
वाढत्या महागाईमुळे अशक्य होत आहे. तरी आमची मनौती 5% करण्यात यावी व प्रति
मुद्रांक विक्रीमागे 20 रु. सेवाशुल्क मिळावे..
2) राज्यात सुरू असलेली ई-चलान तसेच e-SBTR ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांचे मार्फतच राबविण्यात यावी व त्यासाठी कमीत कमी सेवा शुल्क रु. 100 आकारण्याची परवानगी मिळावी.
3) शासनाच्या अधिकृत सेवा पुरविणे ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व
दस्तलेखक यांनाच मिळावी.
4) मयत मुद्रांक विक्रेत्यांचे कुटुंबातील व्यक्तीस वारसाहक्काने परवाना मिळावा. 5) मुद्रांक विक्रेत्यांना 500 रु. वरील सर्व प्रकारचे स्टॅम्प उपलब्ध करुन द्यावेत.
6) मुद्रांक विक्रेत्यांना शासकीय जागेत / न्यायालयाचे आवारात बसण्याची परवानगी द्यावी..
7) महाराष्ट्रातील ट्रेझरीमध्ये हजारो करोडोंचे स्टॅम्पपेपर पडून आहेत. ते मुद्रांक विक्रेत्यांना विक्री करीता उपलब्ध करुन द्यावेत.
8) गेल्या महिन्यात शासनाने 30 हजार रुपये स्टॅम्प ड्युटीची मर्यादा 10 हजारावर
ती पुन्हा 30 हजारावर पुर्ववत करण्यात यावी.
9) प्रत्येक मुद्रांक विक्रेत्याला मदतनीस ठेवण्याची परवानगी द्यावी.

मा. दिलीप देवरे मा. कार्याध्यक्ष-महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button