शहर

शिवजयंती निमित्त संगमनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

भोर प्रतिनिधी दत्तात्रय बांदल

भोर तालुक्यातील संगमनेर येथे शुक्रवारी (दि.२१) ला थाटामाटात शिवजयंती साजरी होणार असून त्यानिमित्त पाच दिवस अगोदर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवारी संगमनेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात महिला तरुण वर्ग व नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. यादरम्यान प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन संगमनेर गावातील स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले.

या शिबिराचे कामकाज ओम ब्लड सेंटर पुणेच्या डॉक्टर प्रज्ञा कदम, प्रंजाली नलावडे, प्रवीण चौधरी, स्मिता गायकवाड यांनी पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button