शहर

सेंट मेरी हायस्कूल डहाणू येथे डहाणू तालुका स्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न

टाईम्स 9 मराठी नेटवर्क
उपसंपादक – विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640.

पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सेंट मेरी हायस्कूल येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्यातर्फे आयोजित डहाणू तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा बुधवार दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी अतिशय उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेत डहाणू तालुक्यातील शाळांमधील 24 संघाने सहभाग घेतला होता .

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले, पंचायत समिती डहाणू गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल, पालघर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव धनंजय वनमाळी, सेंट मेरी हायस्कूलच्या संस्थेचे विश्वस्त डॉ. अमरदीप सिंग मारवा, सहसचिव हेमंत पांचाळ, मुख्याध्यापक सिरील लोपिस, क्रीडा शिक्षक व पालघर जिल्हा विभागीय सचिव लक्ष्मीकांत भंडारी, तालुका क्रीडा केंद्रप्रमुख व पूज्य आचार्य भिसे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. श्री. निलेश आत्माराम गायकवाड उपस्थित होते.

या 24 संघाच्या हॉलीबॉल स्पर्धेमध्ये 14 वर्षीय मुलांच्या गटामध्ये सर्वप्रथम सेंट मेरी हायस्कूल डहाणू संघाने सर्वप्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक
एच एम पारेख डहाणू शाळेच्या संघाने पटकावला आहे 17 वर्षीय मुलांच्या गटामध्ये देखील सेंट मेरी हायस्कूल डहाणू संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक क्रेडो वर्ल्ड स्कूल सावटा शाळेच्या संघाने पटकावला आहे तर सर्वाधिक 19 वर्षाच्या मोठ्या मुलांच्या संघामध्ये प्रथम क्रमांक बाबुभाई पोंदा ज्युनिअर कॉलेज डहाणू तर द्वितीय क्रमांक ज्ञान भारती सी टी ई एस कॉलेज वडकून यांनी पटकावला आहे तसेच 14 वर्षीय मुलींच्या संघामध्ये सर्वप्रथम क्रमांक शासकीय आश्रम शाळा धामणगाव तर द्वितीय क्रमांक
क्रेडो वर्ल्ड स्कूल सावटा संघाच्या मुलीने पटकावला आहे

तर 17 वर्षीय मुलींच्या संघाच्या गटामध्ये सर्वप्रथम क्रमांक शासकीय आश्रमशाळा धामणगाव आणि द्वितीय क्रमांक एच एम पारेख हायस्कूल डहाणू शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे तर सर्वाधिक 19 वर्षीय मुलींच्या मोठ्या संघाच्या गटामध्ये प्रथम क्रमांक शासकीय आश्रमशाळा धामणगाव संघाने पटकावला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button