महाराष्ट्र
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीची आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली पाहणी

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 837 448
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले.आज काही ठिकाणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्तांच्या भेटी घेऊन पाहणी केली आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात विनंती केली होती त्यांनी तात्काळ दखल घेत आज श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच ,जिल्ह्यातील सर्व प्रांत अधिकारी,तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने ३४९० हेक्टर वरील फळबागा व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.त्याचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नियमाच्या बाहेर जाऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा करण्यात येईल असेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष .मदनसिंह मोहिते पाटील,आमदार राम सातपुते,सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन सरचिटणीस .धैर्यशील मोहिते पाटील,.प्रतापराव पाटील, .शिवाजी कांबळे,भारत नाना पाटील,.दीपक वाडदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.




