महाराष्ट्र

सातारा येथील रयत शिक्षण संस्थे च्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग ला प्राचार्य आबासाहेब देशमुख यांची सदिच्छा भेट आणि शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन .

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. ——-97 30 867 448

आज शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ,कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंगला महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.सी. आत्तार यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी संस्थेचे माजी सचिव डॉ. अशोक भोईटे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिकचे पुणे विभागीय संचालक डॉ.ए. डी. जाधव कक्ष अधिकारी संतोष वामन हे उपस्थित होते.
तसेच महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब देशमुख यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सल्लागारपदी निवड झाल्याने उपस्थितांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ- नाशिक विभागीय केंद्र पुणे ,यांच्यावतीने कला वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे शुक्रवार दिनांक 28 जुलै 2023 रोजी आयोजित” नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उद्दिष्ट ” व आकृतीबंध स्पष्ट करुन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक संधी व आव्हाने यावर विषयावर पुणे विभागीय केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. आबासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन केले
सदर बैठकीस सातारा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या” यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ” अभ्यासक्रम केंद्राचे केंद्रप्रमुख तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button