शैक्षणिक

इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगरूळ च्या दोन मुली शिष्यवृत्तीस पाञ

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षात झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ 8 वी या परीक्षेत इंदिरा माध्यमिक विद्यालय मंगरूळ ता तुळजापूर येथील कु आर्या अमोल शिंदे ,व कु कीर्ती कमलाकर कोरेकर या दोन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीस पाञ झाल्या आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनिना पुढील 04 वर्षें आता वर्षाला 8500/- एवढी शासनाकडून शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी भेटणार आहे .

मंगरूळ बिट मधून एकाच शाळेतील 02 विद्यार्थ्यांनी होल्डर होणारी ही एकमेव शाळा आहे.त्यानिमित्ताने त्या दोन विद्यार्थ्यांनिंचा आज विद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुदर्शन शिंदे सर ,सह शिक्षक प्रभाकर चव्हाण सर ,जब्बार शेख सर , सुनंदा बचाटे मॅडम , बालाजी डोंगरे सर ,श्री बंडू डोंबाळे सर ,प्रा अनिल बनसोडे सर, प्रा बालाजी गुरव सर ,प्रा कुसुम करपे मॅडम , कल्पना माशाळकर मॅडम आशिष साठे सर ज्ञानदेव लोहार ,शिवाजी पारधे , विजया जाधव , दाजीबा मिसाळ , सुभाष बाशेवाड, व विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button