दोन दिवसानंतर सार्थक पोहचला घरी..अन् महेश मुळे सार्थकला भेटले त्याचे वडिल—-महेश कोळेकर

टाइम्स 9 मराठी न्यूज
डोळ्यातल पाणी आणि बापाचं प्रेम कधीच मोजता येत नाही. ….. 9/06/2023 रोजी सोलापूर येथे मेळा मनोरंजनाचा हा कार्यक्रम हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे सायंकाळी ठीक 5 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्ताने महेश बजरंग कोळेकर हा Sun मराठी चा प्रमोटर म्हणून हरिभाई देवकरण प्रशालेच्या गेट वर पास वाटप च काम करीत होता. त्यावेळी तिथे समोर रोडलगत झाडाखाली एक शाळेतील मुलगा बसलेल्या मुलाकडे नजर गेली महेश ने त्याला ही जाऊन पास दिला.
आणि मी समोरच असणाऱ्या बस स्टॉप वर बाकड्यावर जाऊन बसलो. तो लहान मुलगा पुन्हा महेशच्या बाजूला येऊन बसला. मी त्याला विचारलं की तू कोणत्या शाळेत आहेत तर तो म्हणाला गांधीनाथा मग मी पुन्हा त्याला विचारलं इथं हरिभाई समोर काय करतोय तर तो बोलला भैय्या मी दोन दिवस झाले घर सोडून बाहेर फिरतोय. मग मी विचारलं अस का? त्यावर त्याने रडायला सुरुवात केली. मी त्याला समजावून सांगितलं. आणि त्याच्या कडून त्याच्या वडिलांचा नंबर घेऊन त्याच्या वडिलांना फोन करून सांगितलं की तुमचा मुलगा व्यवस्थित सुखरूप आहे. हरिभाई देवकरण शाळे समोर बसला आहे तो माझ्याजवळ आहे.
अक्षरशः त्याच्या वडिलांनी रडायला सुरुवात केली. त्यांचा तो रडत असतानाचा आवाज आणि काळजी पाहून माझ्या आणि माझ्या कडेला बसलेल्या समर्थ च्या सुद्धा डोळ्यात पाणी आले.थोडा वेळाने त्याचे वडील गाडीवरून आले. त्या मुलाला पाहताच गाडी उभ्याने टाकून पळत रडत माझ्याजवळ येऊन त्यांनी माझे रडत रडत पाय धरले. दोन दिवस त्या मुलाचे वडील त्या मुलाला तहानभूक विसरून शोधत होते. त्यांचा काळवंडलेला चेहरा खूप काई सांगून जात होता. अक्षरशः अख्ख बस स्टॉप पाहत होत येणारे जाणारे थांबून विचारपूस करत होते.
पण त्या मुलाच्या वडिलांनी माझे पाय सोडले नाहीत. माझ्या डोळ्यातून ही पाणी आले. त्यांना मी समाजाऊन सांगितलं आणि तो मुलगा त्यांच्या स्वाधीन केला. शेवटी जाताना त्यांनी माझे हात हातात घेऊन माझ्या गळ्याला गळा लावून ते रडले. ते त्या मुलाचे वडील खूप वाईट वाटलं यार….पण शेवटी जे ते बोलून गेले ते मात्र खूप काही होत माझ्यासाठी….. ते मला बोलले की, खरच साहेब तुम्हाला जन्म देणाऱ्या आईवडिलांनी खूप पुण्य केलंय म्हणुन त्यांच्या पोटाला तुमच्या सारखा मुलगा देशभक्त मुलगा समाजउपयोगी मुलगा जन्माला आला.
मी फक्त रडत होतो. आणि त्या मुलाचे आणि त्याच्या वडिलांचे आनंदाश्रू आणि आनंद गगनात मावत न्हवता…..पण मी माझया मनातल्या मनात म्हणत होतो की, ज्यांच्या पोटाला मी जन्म घेतलाय ते नशीबवान नाहीत तर मी त्यांच्या पोटाला जन्म घेतलाय म्हणून मी नशीबवान आहे. चला बाकी काही नाही….आजचा दिवस सार्थकी लागला.



