सर्वसामान्यांचा असामान्य कार्यकर्ता म्हणून अश्वजित कांबळे सर्वपरिचित आहेत – ॲड राहुल मखरे

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबाईल – 8378076123
सर्वसामान्य कुटुंबाची खाजगी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे कामकाज एका चुटकीसरशी सोडवणारा सामान्यांचा असामान्य कार्यकर्ता म्हणून अश्वजित कांबळे यांचे नाव प्रसिद्ध असल्याचे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टिचे महासचिव ॲड राहुल मखरे यांनी केले.

इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते अश्वजित सिध्देश्वर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी ॲड समीर मखरे, युवराज बन सर आदि उपस्थित होते. यावेळी अश्वजित कांबळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तर त्यांना ॲड राहुल मखरे, ॲड समीर मखरे यांनी केक भरवून शुभेच्छा दिल्या.

बावडा येथील मुजमिल तांबोळी मित्र परीवाराच्या वतीने माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते अश्वजित सिध्देश्वर कांबळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यालयाचे संचालक संतोष सुर्यवंशी, बावडा ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब कांबळे, मुजमिल तांबोळी, चिंतामणी गायकवाड, पत्रकार शौकत तांबोळी, प्रेस फोटोग्राफर सुरज बोरगांवकर, गणेश पावसे, सोमनाथ शिंदे, समिद तांबोळी, शाहीद अत्तार, रहिम तांबोळी आदि उपस्थित होते.
गणेशवाडी येथे अश्वजित कांबळे मित्र परीवाराच्या वतीने अश्वजित कांबळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मोहंमद कैफ तांबोळी, मुजाहिद तांबोळी, सद्दाम फुलारी, शौकत तांबोळी यांनी त्यांना शाल, श्रीफळ देवून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.




