शहर

सदाशिवराव माने विद्यालयातील सन १९८९-९० च्या विज्ञान शाखेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

उपसंपादक —–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

सदाशिवराव माने विद्यालय अकलुज सन १९८९-९० सालच्या १२ वी विज्ञान शाखेच्या माजी विद्यार्थी , विद्यार्थीनी यांचा स्नेह मेळावा ३२ वर्षाच्या खंडानंतर डॉ बाळासाहेब सुर्यवंशी यांचे कन्याचा साखरपुडा संमारंभ चे औचीत्य साधून स्वराज्यांचे अमृत महोत्सवात शुक्रवारी १२ ते ५ कालावधीत राजेशाही सुविधा, खवैय्य यांचे जीभेचे लाड पुरविणाऱ्या शाही बैठक व्यवस्था असलेल्या चेहिता रिसोर्ट अकलुज येथे संपन्न झाला .

स्नेहमेळावेस ५० माजी विद्यार्थी विद्यार्थीनी नी स्नेहपूर्वक सहभाग नोंदवून त्याचे जूनी आठवणी , प्रसंग , शिक्षा ,पाठीवरील थाप ,सदय परिरिस्थिती ,नोकरी मुले यांचे यश , प्रशंसा , सत्कार , भावना , उल्लेखनीय कार्य सर्वाना शेअर केले . ह्या बॅचचे वैशिष्ट म्हणजे सर्वच माजी विद्यार्थी या भारत देशाचे सुजान नागरिक झाले असून त्यांची शिक्षण, अर्थकारण , राजकारण , समाजकार , शेती क्षेत्र , वैद्यकिय क्षेत्र, आभियांत्रीकी , औषध शास्त्र , सेवा , कृषि क्षेत्र, अर्थ विभाग , पशुवैद्यकिय विभाग , व्यापार , अभिनय , व्यवसाय ‘ व्यवसाय , प्रशासन इत्यादी क्षेत्रात विशेष प्रविन्यासह समाजकारण सह सेवा पुरवित आहेत व वरील क्षेत्रात नावलौकीक मिळवीला आहे.

स्नेह मेळावेस कोरेकर सर , गुरुगुळे सर , राऊत सर , एल डी बाबर, बी.व्ही बाबर ‘ देशमुख सर , पाटील सर , घाटगे सर या पुण्यनीय ‘ पुज्यनीय आदर्श व्यकतीमहत्व असलेल्या गुरुवर्यानी सहभाग नोंदविला . उपस्थितीत गुरुजणांचा यशोचीत शाल स्मृती चिन्ह पुष्प गुच्छा सह मानाचा सन्मान करण्यात आला . उपस्थितीत विद्यार्थी विद्यार्थीनी गुरुजन यांचे प्रेम व स्नेहाचे प्रतिक गुलाब पुष्प देऊन हलगीच्या १००१ नादासह जंगी राजेशाही स्वागत करण्यात आले .

गुरुवर्य यांनी मार्गदर्शनपर हितगुज मध्ये ह्या ९० बॅच सारखी आज्ञाधारक , असधारण , कष्टाळू, शिस्तप्रय , अष्टपैलू व्यक्तीमहत्व असलेले उत्तूग यश, मान, किर्ती संपादन केलेली बॅच असल्लेबाबत प्रत्येक गुरुजनांनी उल्लेख केला व शुभ आर्शीवाद दिले . कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन जाकिर पठाण , सतिश कचरे, भाऊसाहेब लावंड , प्रविण लोंढे , राजू जाधव , सुभाष मुंडफणे यांनी केले . कार्यक्रमास सर्व मित्र , मैत्रीणीसह डॉ विनोद शेटे यांचे विशेष सहाय्य लाभले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सुभाष मुंडकणे यांनी केले व अमरीश कदम यांचे अभार प्रदर्शनाने सांगता झाली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button