शहर

अकलुज शहर काँग्रेस कमेटी च्या माहिला शहरअध्यक्ष शैला गोसावी यांना अकलुज पोलिसा कडून झालेल्या जबर मारहाणी चा पोलिस उपविभागीय कार्यालयावर उद्या जाहीर निषेध मोर्चा

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती 7 दिवसावर आली आसुन महिन्यातच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेची पायमल्ली करून कोणाच्या तरी सांगण्यावरून बहुजन समाजातील चळवळीतील लोकांना टार्गेट करणारे अकलूजचे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड यांनी अकलूज शहर काँग्रेस कमिटी चे महिला शहर अध्यक्षा श्रीमती शैला गोसावी यांना उघडे नागडे करून काठीने व पट्टयाने मारहाण केली आहे.

तसेच अकलूज येथील चळवळीचे कार्यकर्ते श्री. रघुनाथ साठे,श्री.मंगेश साठे, श्री.वैभव लोखंडे या युवकांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करणारे आरोपींवर तक्रार करूनही गुन्हा दाखल केला नाही.उलट त्यांचेवरच खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप महाविकास आघाडी कडुन करण्यात आला आहे.

या पोलिसांच्या कृत्याच्या व मारहाणी च्या निषेधार्थ
आणि त्यांच्या विरोधात उद्या शनिवार दिनांक 8/4/2023/रोजी पोलिस उपविभागीय अधिकारी अकलुज यांचे कार्यालयावर सर्व आंबेडकर प्रेमी तसेच सर्व पक्षीय व महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तरी या निषेध मोर्च्यात महाविकास आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी उद्या शनिवार दि. 8/4/2023 रोजी सकाळी 10 वाजता सदुभाऊ चौक अकलूज या ठिकाणी उपस्थित राहुन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button