शहर

हनुमान जयंती नरसिंहपूर परीसरातील गावात उत्साहात साजरी

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबाईल – 8378076123

अंजनी पुत्र, रामभक्त हनुमान जयंती परीसरातील गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रात्रभर भजन, कीर्तन, जागरण व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

अंजनी पुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव हनुमान जयंती म्हणून आज सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने ग्रामीण भागात गावोगावी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावो गावच्या हनुमान मंदिरामध्ये स्थानिक भजनी मंडळींनी भजन, कीर्तन व जागरण करून सकाळी सहा वाजता फुले टाकून फटाक्याच्या आतषबाजीत जन्मोत्सव साजरा केला. या निमित्ताने लहान बालके, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेशवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये यशवंत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष नामदेव सोपान घोगरे यांच्या वतीने हर्षवर्धन घोगरे यांना आरतीचा मान मिळाला. त्यानंतर ग्रामस्थांना खीर, आमटी, भाकरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. तसेच पिंपरी बुद्रुक, टणू, ओझरे, नरसिंहपूर, गिरवी, गोंदी, सराटी, निरनिमगाव आदि गावात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button