महाराष्ट्र
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपूते यांच्या प्रयत्नांने सदाशिवनगर ग्रामपंचायतीस २४ लाखाचा निधी मंजुर

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या पाठपुराव्यामुळे सदाशिवनगर गावाच्या विकासासाठी सदाशिवनगर ग्रामपंचायतीस २४ लाख निधी मंजूर. झाला आसुन
अनुसूचित जाती जमाती नवबौध्द घटकांच्या विकासासाठी सदाशिवनगर ग्रामपंचायतीस २४ लाख निधी मंजूर झाला आहे
विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व विधानसभा आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून सदाशिवनगर गावातील अनुसूचित जाती जमाती, नवबौध्द घटकांच्या विकासासाठी २४ लाख रुपये निधी मंजूर झाला असून हा निधी ( दलित वस्ती सुधार योजना ) सन २०२२-२०२३ अंतर्गत ओवाळवस्ती – २ रक्कम ३ लाख, कामगार कॉलनी रक्कम २.९० लाख, लांडगीरमाळ १- ५ लाख, लांडगीरमाळ २- ३ लाख, बनसोडेवस्ती ५ लाख, बनसोडेवस्ती ( आडवामाळ ) ५ लाख अशा कामांसाठी एकूण २४ लाख रुपये निधी प्राप्त झाला असल्याने सदाशिवनगर ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.



