रावगाव जिल्हा परिषद शाळेत बाल दिंडीचे आयोजन

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
आषाढी वारीचे औचित्य साधून रावगाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा रावगाव येथे विद्यार्थ्यांच्या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते, शाळेचे मुख्याध्यापक बबन पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिक्षक महेंद्र शिंदे ,प्रताप राऊत, रोहिणी चव्हाण,विद्या गंभीर , रूपाली काळोखे मॅडम यांच्या नियोजनाने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले.

पालखी सोहळ्याचे पुजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भागवत बरडे व उपाध्यक्ष सुहास जौजाळ यांच्या हस्ते करून पालखी मार्गस्थ करण्यात आली. विद्यार्थी विठ्ठल -रुक्मिणी सह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषेत दिंडीत सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा धारण केली होती टाळ मृदंगाच्या गजरात झेंडेकरी, सेवेकरी ,वारकरी असे विद्यार्थी सामील झाले होते तर मुली साडी परिधान करून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन व इतर मुले हातात भगव्या पताका घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते ,टाळ मृदूगांच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा तुकाराम चा गजर करत व यावर ठेका धरत गावातील प्रमुख मार्गावरून या दिंडीचे मार्गक्रम करण्यात आले.
एसटी स्टँड परिसर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर व यशोदा माता मंदिर या परिसरात गोल व उभे रिंगण करून फुगड्या खेळण्यात आल्या या पालखी समवेत ग्रामस्थ व पालकही मोठ्या संखेने उपस्थित होते, विद्यार्थ्याना गोड खाऊ देऊन पालखीचा समारोप करण्यात आला.



