शहर

सफाळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे एक दिवसीय स्वास्थ शिबिर केळवा रोड येथे संपन्न

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640

सफाळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे एक दिवसीय स्वास्थ्य शिबिर पालघर जिल्ह्यातील केळवा रोड रोठे येथील श्री. अंबिका योग सेवा केंद्र येथे मंगळवार 07 जानेवारी रोजी पार पडले हे शिबिर विजय पाटील, नरेश पाटील, आणि भिका सोनवणे यांच्या मार्फत आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात 27 सदस्यांनी सहभाग घेतला होता .

शिबिराची सुरुवात प्रार्थना दीप प्रज्वलन, संस्थेची माहिती, प्रस्तावना तसेच संस्थेच्या कार्याची प्रत्यक्ष पाहणी त्या नंतर अजित भाईनी ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.योग शरीरातील प्रत्येक पेशीला बरे करण्यासाठी आणि वाढविण्याचे कार्य करत असल्याने तुमचे शरीर आपोआप अधिक रोगप्रतिकारक बनते. असे मार्गदर्शन केले.

डायबेटिस हा रोग नाही आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर व डायबिटीसला इतर रोगाला दूर करू शकतो असे सांगितले. दामोदर चव्हाण, सुहास सुभाष पाटील यांनीही यावेळी आपले मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button