महाराष्ट्र
श्रद्धा सावंत हीचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121 टाईम्स 9 मराठी न्यूज,
सांगली : काळमवाडी (ता. वाळवा) येथील श्रद्धा हणमंत सावंत हिने मध्यप्रदेश मधील विदिशा जिल्ह्यातील चंदनपुर येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 17 वर्ष वयोगटामध्ये 43 किलो वजनी गटामध्ये देशात तिसरा क्रमांक पटकावला.

श्रद्धा हणमंत सावंत हिने नेर्ले (ता. वाळवा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या काळमवाडी भाग शाळेची विद्यार्थिनी आहे. तिला मुख्याध्यापिका के. एल. माळी, क्रीडा शिक्षक जे.एल. मोहिते, वस्ताद संदीप पाटील, आदींचे मार्गदर्शन लाभले.



