जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सपोर्ट नशा मुक्ती केंद्र आगरवाडी सफाळे यांच्यावतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त सपोर्ट नशा मुक्ती केंद्र आगरवाडी सफाळे यांच्यावतीने सफाळे राजगुरू हमपंथी विद्यालय येथे गुरुवार दिनांक 26 जून रोजी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या जनजागृती कार्यक्रमात सपोर्ट नशा मुक्ती आगरवाडी केंद्राचे संचालक विजय पवार यांनी विद्यार्थ्यांना नशेचे भविष्यातील दुष्परिणाम आणि दिवसेंदिवस तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. जर तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवनच केले नाही. तर विकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. यासाठी नशेला नाही म्हणणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमानंतर अंमली खाद्य पदार्थ विरोधी राजगुरू हम पंडित विद्यालय सफाळे विद्यालयातील विद्यार्थ्यांची राजगुरु हम विद्यालय ते प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे अशी भव्य पाई जनजागृती रॅली काढण्यात आली होती.
या रॅलीमध्ये या विद्यार्थ्यांनी नशेविरोधी घोषणाबाजी केली.

यावेळी या कार्यक्रमाला सफाळे पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सावंत, उपसरपंच राजेश म्हात्रे ,राजगुरू हम पंडित विद्यालय प्राचार्य मधुमती पाटील, व डीएचएल चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



