महाराष्ट्र

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सदस्यपदी डाॕ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) सदस्यपदी डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची निवड झाली आहे.याबद्दल अकलूज येथे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी AICC सदस्य पदी निवड केली केले बद्द्ल डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे आभार मानले व या मिळालेल्या मोठ्या जबाबदारीचे पालन करून सोलापूर जिल्ह्यात आणखी जोमाने कामाला लागुन काँग्रेस मजबूत करण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना काँग्रेस मध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी माळशिरस तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने तालुका अध्यक्ष सतिश पालकर यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी जेष्ठ नेते व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले-देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, रणजितसिंह देशमुख, माळशिरस तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व गिरझणीचे उपस्थित सरपंच मयुर माने, अकलूज शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नवनाथ भाऊ साठे उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी डॉ.धवलसिंह यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button