शहर

मोदींची घोडचूक?विरोधी खवळले…एकवटले…!!पुन्हा हुकूमशाहीचा घणाघात म्हणावं काय?!!लोकशाहीत आततायीपणा नकोय…!!

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

एका बहिणीचे भावा साठी केले गेलेले कडकडीत…खणखणीत….जळजळीत ट्विट….. “पंतप्रधानजी….शाहिद पंप्रधानांच्या मुलाला देशद्रोही,मीर जाफर म्हटलंय…एका मुख्यमंत्र्यांने “राहुल गांधींचे वडील कोण?असा प्रश्न केला?माझे कुटुंबीय व काश्मिरी पंडितांची भर संसदेत अपमान केला की ते नेहरू नांव का लावत नाही?परंतु तुम्हाला संसदेतून पत्रात तजरविण्यात आलं नाही.तुम्ही माझ्या कुटुंबियांना घराणे शाई म्हणता,…एक गोष्ट लक्षात ठेवा…या कुटुंबाने रक्त सांडून भारतीय लोकशाही जोपासली आहे.आमच्या धमन्यात वहात असलेले रक्त तुमच्या सारख भ्याड,सत्तालोभी हुकूमशहा समोर कधीच झुकणारी नाही” तुम्हाला माहित असेलच…ती बहीण आहे…प्रियंका गांधी……..

सध्या भरता सारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात जे सुरू आहेत ते अक्षरश लाजिरवाणे,खाली मान घालविणारे आहे.ज्यांची सत्ता त्यांच्या हातात देशाची लोकशाही,मान मर्यादा टिकविण्याची जबाबदारी आहे. दुर्दैवाने तेच या एकसंघ भारताच्या लोकशाही मूल्यांचे लक्तरे वेशीला टांगण्याचे पाप करत आहे.गेली नऊ वर्षे सर्व व्यवस्थित चालत असतांना एखादी मस्ती माणसाला कशी भोवते,हे राहुल गांधी प्रकरण त्याचे उदाहरण.दोन वर्ष पासून प्रलंबित खटल्याचे निर्णय आला,अन चोवीस तासात खासदारकी रद्द करण्याचा खटाटोप केला गेलं.काही तासात एकमेकांचे तोंड न पाहणारे विरोधी पक्ष एकटवले.दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल ते यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव राहुल गांधींना शाहिद झाल्या सारखं दर्जा देऊ लागले.मोदींच्या विरोधात जे विरोधकांना एक होण्याचा फाॕर्मुला जमला नाही,ते केंद्रीय सत्तेच्या घोडचूकी मुळे जमून गेलं. याला मोदींची चूक असंही म्हणता येणार नाही.मात्र संसदेच्या संविधान पीठचा तडकाफडकी निर्णय हा कुठंतरी संशय निर्माण करणारा आहेच.

खासदारकी गेल्या नंतर राहुल गांधी अगदी कठोर झालेत.एका पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींना पुन्हा चॅलेंज केलं…..”अदानीच्या शेल कंपनीत वीस हजार कोटी कोणाचे?मला उत्तर द्या.मोदी-अडाणी यांचे संबंध काय? ते आक्रमक झालेत,होणारच.काळ तर विधानसभेत केजरीवाल यांनी मोदींना घेरतांना म्हटलंय… *”देश का सबसे भ्रष्ट…सबसे कम पढा लिखा….बारहवी पास….अहंकारी नेता….”क्या डरते हो यार”. हे पुढच्या वर्षा पर्यंत सर्व चालूच राहणार…. *या निमित्ताने संसदेच्या बाहेर पडून ही राहुल हे विरोधी पक्षाच्या नेतृत्वाचे केंद्रीय बिंदू ठरले आहे.म्हणूनच जे कांग्रेसला नाही जमलं ते मोदींनी करून दाखविले.
भाजपला जरी वाटत असेल की राहुल यांना लोकसभेच्या मैदानातून थेट साफ केल्यास कोणीच मुकाबला करू शकणार नाही.मात्र उलट हा भाजप साठी हा मुद्दा “बुमरँग” होतोय.देशात राहुल यांची खासदारकी जाणं म्हणजे सर्व विरोधी पक्षांत एक ऊर्जा निर्माण करणारा मुद्दा आहे.प्रश्न असा की ते या मुद्द्याला केव्हा पर्यंत टिकवून ठेवतात.

निवडणुकीच्या अखेरच्या वर्षात असला धुमधडाका चालणारच.दुर्दैवाने लोकशाही मूल्यांची शोकांतिका ठरू नये.राहुल गांधींचा खासदारकी मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर ही गाजयला लागलंय.अमेरिकेचे प्रतिष्ठित खासदार रोज खन्ना यांनी “सदर कारवाई गांधीवादी विचारधारेचा विश्वासघात” असं संबोधले.संयुक्त राष्ट्रचे प्रमुख अटर्निओ गुटरस चे प्रवक्ता फरहान हक यांनी या प्रकरणी आमचे बारीक लक्ष आहेत,त्यांचा पक्ष अपील करणार आहे,आम्ही लक्ष लावून आहोत”.आंतरराष्ट्रीय मीडियात ही हा मुद्दा गाजतोय.कोणीच या प्रकरणी समर्थन केले नाही.म्हणूनच। सत्तेनव थोडं संभाडून पावलं टाकावी.म्हणजे देशाची व लोकशाहीचा फज्जा उडू नये व देशाची बदनामी होऊ नये.(जयहिंद)

अशफाक शेख,वरिष्ठ पत्रकार,सहारा समय, औरंगाबाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button