शहर
अवकाळी व गारपीटीमुळे तालुक्यातील २ हजार ११९ शेतकऱ्यांच्या ९०८.६६ हे क्षेत्राचे नुकसान-तहसीलदार तुषार देशमुख यांची माहिती

उपसंपादक—–हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 867 448
तालुक्यामध्ये १८ मार्च रोजी झालेल्या अवकाळी व गारपीटीमुळे तालुक्यातील २ हजार ११९ शेतकऱ्याचे ३३ टक्के पेक्षा जास्त फळ पिकांचे व बागायती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार तुषार देशमुख यांनी दिली .
अवकाळी व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याची दखल घेत आ रणजितसिंह मोहिते पाटील व आ रामदास सातपुते या दोघांनी तात्काळ नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली .राज्याचे महसूलमंत्री व जिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील एका कार्यक्रमासाठी सदाशिवनगर येथे आले असता सदरची बाब दोन्ही आमदारांनी त्यांना सांगितल्यानंतर त्याच ठिकाणी पालक मंत्र्यांनी तात्काळ बैठक घेतली व नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिली या बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार तुषार देशमुख यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते
तालुक्यातील प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे केले असून पिक निहाय नुकसान पुढील प्रमाणे मका ३९२.८२ हे ,ज्वारी २७.६६ हे ,गहू ८४.९५ ,बाजरी १४.३४ ,कांदा ४८.९५ ,भाजीपाला ४० हे हरभरा २६.७३ हे असे एकूण १५१२ शेतकऱ्यांचे ६३५.४५ हे चे नुकसान झाले आहे तर डाळिंब १५०.६ हे,द्राक्षे ६१.७४,हे आंबा ३१.८४हे ,पपई १०.४९हे ,सीताफळ चिक्कू १.१३ हे ,पेरू ५.५६ हे केळी १२.३९ हे अशा ६०७ शेतकऱ्यांचे २७३.२१ हे फळबागांचे नुकसान झाले आहे .पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून शासनाने नुकसान भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .



