महाराष्ट्र

महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी सरस्वती पवार यांची निवड

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

मैत्री प्रतिष्ठान सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड च्या कार्याची नावलौकिक पाहून सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी माढा तालुक्यातील रा.टेंभुर्णी “सरस्वती ताई पवार” यांची महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेड तथा मैत्री सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडच्या “महिला प्रदेशाध्यक्ष” पदी निवड करण्यात आली.

यावेळी सरस्वती पवार यांनी महिलांसाठी महाराष्ट्रभर अविरत पणे काम करणार असे आश्वासन दिले. महाराष्ट्र स्वाभिमानी ब्रिगेडचे तथा मैत्री प्रतिष्ठानचे माळशिरस तालुका अध्यक्ष शंकर मस्के, व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button