सोलापूर जिल्ह्याला राष्ट्रवादी चा “बालेकिल्ला” बनविणार… धैर्यशील मोहिते पाटील

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत,लोकप्रिय आणि लोकप्रेरीत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांनी माढा तालुक्यातील मोडनिंब येथे जाहीर सभा घेतली…

सोलापूर जिल्ह्याच्या जनतेचा स्वाभिमान जपण्यासाठी आम्हीं पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कसल्याही परिस्थितीत सोलापूर जिल्हा हा शरद पवार साहेबांचा “बालेकिल्ला” बनवून दाखवू असे धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले…
यावेळेस शरद पवार साहेबांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज आपला माणूस धैर्यशिल मोहिते-पाटील यांना “तुतारी” वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून संसदेत पाठवण्याचे आवाहन केले…

यावेळेस माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते-पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील,उत्तमरावजी जानकर,शिवाजीनाना कांबळे,माढ्याचे नगराध्यक्ष मिनलताई साठे,सोलापूर च्या मा महापौर नलिनी चंदेले,विठ्ठल चे अभिजीत आबा पाटील,संजय कोकाटे,संभाजी शिंदे,साईनाथ अंभगराव,संजय पाटील घाटणेकर,दादासाहेब साठे,धनंजय डीकोळे,हरिदास रणदिवे,समीरभाई मुलाणी,बाबाराजे देशमुख,शेखर माने,नागेश फाटे,मोडनिंब चे सरपंच बाबुराव सुर्वे,भारत नाना पाटील यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते…
सदर सभेप्रसंगी माढा लोकसभा मतदार संघातील बहुसंख्य शेतकरी हजर होते…



