शहर

अकलुज नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा चाकोरे येथील ज्योतीराम नलवडे यांचे पैशाचे पाकिट दिले परत

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज नगरपरिषद कर्मचारी सागर दत्तू बनसोडे यांना अकलूज नगरपरिषदचे काम सुरु असलेल्या एका साईटवर बांधकाम विभागाचे -आनंद जाधव, अतिक्रमण विभागाचे- शिवरत्न लोंढे, सागर बनसोडे हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना पैशाचे पाकिट रक्कम रूपये 5600 व त्यात महत्वाचे बँकेचे कागदपत्र असल्याचे आढळून आले. हे सर्व माहिती क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद गोरे यांचे स्वीय सहाय्यक रोहित शेटे यांनी लगेच संबंधित कागदपत्रांवरून ते ज्योतिराम रघुनाथ नलवडे रा.चाकोरे यांचे असल्याचे समजले.त्या नागरिकापर्यंत संपर्क साधून त्यांना अकलूज पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.


अकलूज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना सर्व हकिकत सांगितली असता, पोलिस निरीक्षक गायकवाड यांनीसंबंधित कागदपत्रांवरून त्या नागरिकांची खातरजमा करून त्यांना ते पैशाचे पाकिट रक्कम रूपये 5600 व सर्व कागदपत्रे सागर बनसोडे यांच्या हस्ते संबंधीत नागरिक ज्योतीराम नलवडे यांच्या सुपूर्द केले. तसेच अकलूज नगरपरिषद प्रामाणिक कर्मचारी सागर दत्तू बनसोडे यांचा त्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे व सर्व कर्मचारी यांचे असेच सहकार्य रहावे हि अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button