शहर

आमदार संजय शिंदे हे मतदार संघात जाण्यासाठी ज्या रस्त्याचा वापर करतात तो रस्ता जनशक्ती संघटना श्रमदानाने तयार करुन देणार-अतुल खुपसे.

उपसंपादक ———हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे ज्या रस्त्याने करमाळयाला जातात त्या रस्त्याला निधी उपलब्ध होऊ शकत नाही जनशक्ती संघटना ‘श्रमदान’ करून करणार ‘आंदोलन’

माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली आहे. हा रस्ता माढा तालुक्यातील ३६ गावे व करमाळा तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग असून या रस्त्यासाठी लोकप्रतिनिधी असणारे संजय शिंदे निधी उपलब्ध करू शकत नाहीत म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिले आहे.

माढा तालुक्यातील निमगाव टें ते उपळवाटे – केम रस्तावर भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर मोठ मोठे दगड गोटे आले आहेत. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना तारेवरची कसरत करत रस्त्याने प्रवास करावा लागतो. खराब रस्त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. शेतकरी, दूधवाले, विद्यार्थी यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. इतकी दयनीय परिस्थिती असताना देखील मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार संजय शिंदे रस्त्यासाठी निधी उपलब्ध करू शकत नाहीत. त्यांना देखील या रस्त्याने येताना जाताना मोठी तारांबळ उडते.

यासाठी जनशक्ती संघटनेच्या वतीने शुक्रवार दि.२४ मार्च रोजी श्रमदान करून या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग यांना देण्यात आले आहे

आमदार संजय शिंदे हे करमाळा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी आहेत. याच रस्त्यावरून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा त्यांचा प्रवास होतो. जो आमदार स्वतःच्या राहत्या गावापासून मतदार संघात जायला रस्ता करू शकत नाही तो आमदार विधानसभा मतदारसंघाचा काय विकास करणार..?

अतुल खूपसे पाटील
संस्थापक,जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button