फरहान मुलाणी चे 12 वी च्या (HSC Board) परीक्षेत उत्तुंग यश…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील टाइम्स 9 न्यूज नेटवर्क चे संपादक नौशाद मुलाणी यांचे चिरंजीव फरहान मुलाणी याने 2025/26 एच एस सी बोर्डाच्या परीक्षे मध्ये 75.17 टक्के गुण मिळवत घवघवित असे यश संपादन केले…

फरहान मुलाणी याने मिळवलेल्या यशाने त्याची जिद्द,कष्ठ आणि आपल्या कामाच्या प्रती असणारी खरी मासुमीयता त्याने दाखवून दिली,त्याने मिळवलेले यश हि त्याच्या कामाची पावती असुन भविष्यात उच्च शिक्षण घेउन जनतेची सेवा करणार असल्याचे फरहान मुलाणी याने टाइम्स 9 न्यूज चे अकलूज प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांच्याशी बोलताना सांगितले…

पुढे बोलताना तो असे हि म्हणाला की,प्रत्येक परीक्षे पेक्षा तुमचं स्वप्न मोठं असायला हवं! माझ्या या यशा मध्ये आज्जी,आजोबा,आई,वडील आणि भाऊ यांचा हि मोलाचा वाटा असुन त्यांच्या आशीर्वादानेच आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज मी पार केला…
पुढील शिक्षणासाठी घरातील सर्व मंडळीशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे हि तो शेवटी म्हणाला,फरहान मुलाणी याने मिळवलेल्या या यशाने मात्र नौशाद मुलाणी यांचे वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे…
फरहान मुलाणी याच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्याच्या मित्र मंडळीनी हि शुभेच्छा दिल्या…



