महषिॅ प्रशालेत जागतिक चिमणी दिन साजरा

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी
शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेत जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्रा.धनजय देशमुख यांचा सत्कार मुख्याध्यापक संजय गळीतकर याच्या हस्ते करण्यात आला. त्यानी आपल्या मनोगतातून जगातील २६ प्रकारच्या चिमण्यांपैकी ५ प्रकारच्या चिमण्या भारतात आढळतात. चिमणी ही कीटक भक्षी आहेत त्यामुळे चिमणीचे अन्न पिकापेक्षा जास्त कीटकच असते म्हणून चिमणी हे शेतीचे अप्रत्यक्षपणे रक्षण करते म्हणून आपण चिमणीचे रक्षण करणे आवश्यक आहे असे सांगितले ते पुढे म्हणाले ‘शहरीकरण, मोबाईल रेडिएशन तसेच वृक्षांची बेसुमार कत्तल यामुळे चिमण्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला याचा परिणाम गेल्या २० वर्षांमध्ये चिमण्यांची संख्या जवळजवळ ८०ते८५टक्क्यांनी घटली आहे. जसजसा उन्हाळा वाढत जाईल तसतशी पाण्याची टंचाई वाढत जाते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये किंवा छतावर चिमणी साठी अन्नधान्य व पाण्याची सोय करावी.
यावेळी प्रा. देशमुख यांनी चिमण्यांसाठी प्राथमिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी विद्यार्थींना प्लास्टिकच्या बॉटल,प्लेट, पाईप, लाकडी बॉक्स,कॅन यापासून चिमण्यांच्या निवा-याची , पाणी व अन्नधान्य मिळवण्यासाठी ची साधने कशाप्रकारे करतात ते प्रात्यक्षिक दाखविले. तसेच विद्याथीॅनी संजीवनी बिराजदार हिने आपल्या भाषणातून चिऊताई साठी चारा आणि पाणी ठेवूया खोपा तयार करूया हा संदेश दिला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव, पर्यवेक्षक अंकुश एकतपूरे उपमुख्याध्यापक भारत चंदनकर,शिक्षक बाळासाहेब काटकर ,भाग्यश्री गुजरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वर्षाराणी तुपे यांनी तर आभार नाझीया मुल्ला यांनी मानले



