शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता मंदिर, श्री क्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनाप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने लागू दे,रविवार दि.26/3/2023 रोजी मालेगाव संपन्न होणारी तसेच रविवार दि. 26/3/2023 रोजी संभाजीनगर येथील सभा यशस्वी होऊ दे, असे साकडे कुल स्वामिनी आई तुळजा भवानी चरणी घातले आहे.

यावेळी मराठवाडा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना सचिव अशोक पटवर्धन, जेष्ठ शिवसैनिक, अनंतराव कदम, धाराशिव उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, युवासेना तुळजापूर तालुका अधिकारी प्रतीक रोचकरे, विद्यार्थी सेनेचे विकास भोसले,तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम,उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदें, अर्जुन साळुंके, अमोल जाधव, सुनील जाधव, विभागप्रमुख धुळाप्पा रक्षे, संस्थान सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




