पालघर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सफाळे बोईसर आणि पालघर आगार व्यवस्थापकांचा गौरव

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय धरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
३० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या वाणगाव ते बोईसर दरम्यान रेल्वेची हायटेंशन वायर तुटल्याने रेल्वेसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या अचानक झालेल्या घटनेमुळे प्रवासी मोठ्या गैरसोयीला सामोरे जात होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर डॉ. इंदु राणी जाखड (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद द्रौपदाबाई विजयकुमार कदम यांच्या सूचनेनुसार तातडीने उपाययोजना करण्यात आली होती.1
पालघर, बोईसर आणि सफाळे आगार व्यवस्थापकांनी तत्परतेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रवासी वाहतुकीची व्यवस्था केली होती . त्यामुळे रेल्वे आपत्तीत अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचविण्यात यश आले होते.
या सामाजिक जबाबदारीची दखल घेत मा. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आगार व्यवस्थापक पालघर सुजित घोरपडे, बोईसर आगार व्यवस्थापक शेख आणि सफाळे आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांचा “प्रशस्तीपत्र” देऊन विशेष सन्मान केला आहे.



