महाराष्ट्र

काम करत राहा, मी तुमच्या सोबत ठाम उभा आहे – रामभाऊ सातपुते

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित महेश शिंदे यांच्या संकल्पनेतून भाजपच्या समाजकल्याण उपक्रमांना रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते यशस्वी पूर्णता.

फत्तेसिंह नगर, अकलूज येथील नवीन बाजार मैदानावर महात्मा जोतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती भारतीय जनता पार्टी अकलूज यांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने समाजहिताचे अनेक उपक्रम राबवण्यात आले.समाजासाठी आरोग्य, वाचन आणि स्वच्छता महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन व्यायामासाठी डबल बार, वाचनासाठी ओपन लायब्ररी आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई अशा उपयुक्त सुविधा स्थापन करण्यात आल्या.

या उपक्रमांचे उद्घाटन आरोग्यदूत आमदार रामभाऊ सातपुते यांच्या शुभहस्ते आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली पार पडले.या अभिनव संकल्पनेची कल्पना भाजप युवा नेते महेश शिंदे यांनी मांडली होती आणि त्यांच्याच पुढाकारातून हा उपक्रम यशस्वी झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुजय भैय्या माने पाटील व काकासाहेब जाधव हे होते.या कार्यक्रमात भाजप नवीन बाजार शाखेचे अध्यक्ष भीमराव कांबळे, प्रदीप वाघमारे, दुर्योधन गायकवाड, शंकर मस्के तसेच अनेक कार्यकर्त्यांनी श्रमदान करून समाजासाठी आपली बांधिलकी जपली.हे उपक्रम म्हणजे केवळ उद्घाटन नव्हे, तर फुले-आंबेडकरांच्या विचारांना कृतीतून मान देणं आहे. आरोग्य, शिक्षण आणि पाणी — या जीवनाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button