शहर

डहाणू येथे 25 ते 26 मार्च रोजी महिलांसाठी स्त्रीरंग स्त्री शक्तीचा सोहळा

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार तसेच महिलांना स्वयंरोजगार व उद्योग व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी डहाणू येथे शनिवार दिनांक 25 मार्च ते रविवार दिनांक 26 मार्च 2023 रोजी स्त्रीरंग सोहळा स्त्री शक्तीचा या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

डहाणू नगरपरिषद,नगरपंचायत तलासरी यांच्या पुढाकाराने व राज्य सरकारच्या मदतीने स्रीरंग सोहळा स्त्री शक्तीचा महोत्सव आयोजन करण्यात आला आहे. हा उपक्रम डहाणू स्टेशन पासून 3 किलोमीटर असलेल्या निसर्गरम्य समुद्रकिनारी म्हणजे सी व्हू पार्क डहाणू पश्चिम येथे होणार आहे. या दोन दिवसीय भरविण्यात आलेल्या स्त्रीरंग सोहळा स्त्री शक्तीचा महोत्सवात महिलांच्या सबलीकरण्यासाठी सरकारी योजनांची माहिती महिलांना देऊन महिलांच्या न्याय व हक्का संबंधित व आरोग्य विषयी जनजागृती करण्यासाठी स्टॉल उपलब्ध असणार आहेत.

तसेच महिलांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे.त्याचबरोबर विविध खाद्य पदार्थ आणि कला यासाठी शंभरहून अधिक स्टॉल उपलब्ध असणार आहेत या स्टॉलमध्ये विविध खाद्यपदार्थांचे विक्री करण्यात येणार आहे या सोहळ्यात सहभागी झालेल्या स्त्रियांसाठी अनेक प्रकारचे मनोरंजक कार्यक्रम आणि स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.

या महोत्सवात वारली चित्रकला, लिप्पन कला व हस्तकला,संरक्षण,योग,झुंबा, महिला उद्योजकता व शासकीय मदत, यशोगाथा इत्यादी विषयावर कार्यशाळा देखील घेण्यात येणार आहेत अशी माहित आयोजक यांच्यामार्फत देण्यात आली असून या सोहळ्यात अन्न,कपडे आणि कलाकृती केलेल्या वस्तू
विक्री करण्यासाठी आपला स्टॉल अधिकृत नोंदणी करण्यासाठी 86555 59292 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा किंवा डहाणू नगरपालिका कार्यालयाला भेट द्या….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button