शहर

जुन्या पेन्शन साठी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास माळशिरस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जाहीर पाठिंबा

टाइम्स 9 मराठी न्यूज

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कायमच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या आपल्या उक्तीप्रमाणेच काम केलेले आहे,मुख्यमंत्री असतानाही प्रत्येक घटकाला न्यायच देण्याचा प्रयत्न केला,अगदी हातावरती पोट असनाऱ्या गोरगरीब लोकांना दोन वेळचे जेवण मिळावे याकरीता शिव भोजन थाळी 10₹पासुन ते अगदी मोफत अशी योजना चालु करुन गोरगरीब जनतेला कोरोना काळात मोठ्ठा दिलासा दिलेला होता,

कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती,ज्यांना-ज्यांना,जे-जे देता येईल ते-ते,त्यांनी देन्याचा प्रयत्न केला.आज सत्ता हाती नसतानाही,शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी जो संप पुकारलेला आहे,त्या संपाला उध्दव ठाकरे यांनी आपला पाठिंबा दिलेला आहे त्या अनुषंगाने माळशिरस तालुक्याचे वतीने आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्याची अकलूज व माळशिरस येथे प्रत्यक्षात भेट घेवुन त्यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आपल्या सोबत असल्याचे लेखी पत्राद्वारे कळवविण्यात आले आहे.

या प्रसंगी माळशिरस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख संतोष (भैय्या) राऊत, तालुका उप प्रमुख महादेव बंडगर, अकलूज शहरप्रमुख अनिल बनपट्टे, युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवासेना तालुका उपप्रमुख दत्ता साळुंखे,युवासेना तालुका उपप्रमुख दुर्गेश आडके,ज्येष्ठ शिवसैनिक पी.व्ही.कुलकर्णी (वकील),बाबुलाल तांबोळी,अशोक देशमुख, समाधान कचरे,रामदास माने,सोमनाथ ढगे,सचिन सरतापे व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button