संविधानाने दिलेल्या कायद्याच्या चौकटीत अबू आझमी बसावेच लागेल

बी.टी.शिवशरण
मी वंदेमातरम् म्हणणार नाही तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करु शकत नाही असे विधान मुंबईत पावसाळी अधिवेशनात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे मी अल्ला पुढे झुकतो त्याच्या शिवाय मी कुणापुढे ही झुकत नाही झुकणार नाही अशी दर्पोक्ती केली आहे वंदेमातरम् हे राष्ट्रगीत आहे ते भारतातील सर्व देशप्रेमी नागरिकांनी अभिमानाने गौरवाने म्हटलेच पाहिजे वंदेमातरम् या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा दिला आहे या गीतात भारतीय वंश धर्म परंपरा यांचा सन्मान केला आहे
त्यात देशाभिमान वारसा यांचे गुणगान आहे आणि ते सर्वांनी म्हणणे यात गैर किंवा कमीपणा कशाचा आहे देश हा देव असे माझा असे सुंदर विवेचन एका देश भक्तीपर गीतात करण्यात आले आहे देशांपेक्षा कोणी मोठा नाही अगोदर देश श्रेष्ठ आहे मग धर्म जात पंथ भाषा व तुम्ही आम्ही आहोत त्यामुळे भारतीय संविधानाने दिलेले नियम कायदे काणून कर्तव्य अधिकार यांचे पालन करणे हे प्रथम भारतीय नागरिक म्हणून सर्वांचे कर्तव्य ठरते अबू आझमी हे सर्व विसरून वेगळी वाट अवलंबत आहेत हे बरोबर नाही त्यांचा तो उन्मत्त पणा ठरेल ते भारतीय नागरिक म्हणून येथे जन्माला आले आहेत ते भारतीय आहेत त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी वर्तन भाषण आचरण करणे गरजेचे आहे ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विधीमंडळात केलेलीं भाषा वंदेमातरम् मी म्हणणार नाही हे दोन समाजात भेदभाव निर्माण करणारी भाषा आहे त्यामुळे सामाजिक सुरक्षतेला धोका पोहचवणारी ठरु शकते त्यामुळे त्यांनी सभागृहात माफी मागितली पाहिजे



