शहर

सफाळे टेंभीखोडावे मोरीवर एल अँड टी कंपनीचा लोखंड भरलेल्या जड वाहणी ट्रकचा अपघात

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे टेंभी खोडावे ग्रामपंचायतीने टेंभीखोडावे मोरी वरून एल अँड टी कंपनीच्या जड वाहनांना बंदी केली असताना देखील बुधवारी सकाळी 7:00 वाजता एल अँड टी कंपनीचा लोखंडाने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला आहे.

MH-48C- B4374 क्रमांकाचा लाल रंगाचा ट्रक बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी अहमदाबाद येथून 2 ते 3 टन लोखंड घेऊन सफाळे टेंभीखोडावे दिशेने जात असताना सकाळी सात वाजता टेंभी खोडावे मोरीजवळ या ट्रकचा अपघात झाला आहे.

हा ट्रक एल अँड टी कंपनीच्या ठेकेदाराचा असून हा अहमदाबाद इथून आलेला लाल रंगाचा ट्रक 2 ते 3 टन लोखंड घेऊन टेंभीखोडावे गावात चालू असलेल्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्प दिशेने जात होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button