नारपोली भिवंडी ठाणे पोलिसांची कारवाई.. दलाल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रंगेहात अटक

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640 पालघर जिल्हा वृत्तांत.
भक्कम पगाराची नोकरी लावून देतो आयुष्याचे कल्याण करून देतो असे आमिष दाखवून मिरा रोड येथील दोन तरुणींना फुस लावून फसवून घेऊन जाऊन त्यांना भिवंडी येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या घोडबंदर येथील रुबीना (उर्फ) रीना सलीम शेख या दलाल महिलेला सोमवारी दुपारी नारपोली भिवंडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बलाडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्या पथकाने रंगेहात अटक केले असून तिचा साथीदार मुकुंद सध्या फरार आहे. नारपोली भिवंडी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
मिरारोड येथील दोन तरुणींना फुसलावून फसवून तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी देतो असे सांगून घोडबंदर येथील महिला वेश्या दलाल रुबीना (उर्फ) रीना शेख व मुकुंद या दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या दलालांनी या दोन महिलांना भिवंडी येथे घेऊन जाऊन त्यांच्याकडून हे दोन दलाल वेश्या व्यवसाय करून घेत होते याबाबतची गोपनीय माहिती नारपोळी भिवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बलाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांना मिळताच त्यांनी बनावट ग्राहक पाठवून सोमवार दिनांक 13 मार्च 2022 रोजी दुपारी आई बाबा फॅमिली हॉटेल समोर सापळा रचून रुबीना (उर्फ) रीना असीम शेख हिला रंगेहात अटक करून सोमवारी नारपोली भिवंडी पोलीस ठाण्यात तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिचा साथीदार मुकुंद हा सध्या फरार असून त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. तर रुबीना (उर्फ)रीना शेख हिच्या तावडीतून सोडवलेल्या दोन पीडित मुलींची रवानगी नारपोली भिवंडी पोलिसांनी महिला सुधार गृहात केली आहे. सदर प्रकरणातील अधिक तपास नारपोली भिवंडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करत आहेत



