सफाळे विराथन बुद्रुक मानव व परिसर विकास समिती शेड येथे 5 दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत
रोटरी क्लब ऑफ पालघर इनरव्हील क्लब पालघर व रा.आ. पोदार शासकीय वैद्यक महाविद्यालय वरळी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील विटीलाईन विराथन बुद्रुक येथील मानव विकास परिसर समिती शेड येथे गुरुवार दिनांक 16 मार्च ते 20 मार्च 2023 या 5 दिवसीय कालावधीत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत वैद्यकीय निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे.
या आयोजित शिबिरामध्ये गुरुवार दिनांक 16 मार्च रोजी सकाळी 9.ते दुपारी 1. वाजेपर्यंत फक्त स्त्री रोग निदान चिकित्सा तर शुक्रवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 9. ते दुपारी 1. वाजेपर्यंत मुळव्याध भगंदर निदान व चिकित्सा तर शनिवार दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 9. ते दुपारी 1.वाजेपर्यंत कान,नाक,घसा व डोळे इत्यादी तपासणी सुविधा रोग व निदान चिकित्सा उपचार व रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
तर रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी 9. ते दुपारी 1. वाजेपर्यंत सर्व शारीरिक आजारांची तपासणी केली जाणार आहे तर शिबिराच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवार दिनांक 20 मार्च 2023 रोजी सकाळी 9. ते दुपारी 1. वाजेपर्यंत सुवर्ण प्राशन जन्मलेल्या एक दिवसीय बालापासून ते 12 वर्षापर्यंत बालकांचे रोग निदान व चिकित्सा या सर्व मोफत सुविधा व उपचार या शिबिरामध्ये देण्यात येणार आहेत.
तरी सफाळे परिसरातील नागरिकांनी व रुग्णांनी या मोफत वैद्यकीय शिबिरांचा व सुविधांचा या शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब (अध्यक्ष)-श्री.प्रशांत पाटील, (सचिव)-श्री संजय महाजन, (मेडिकल डायरेक्टर)-श्री.रफिक धडा- भ्रमणध्वनी क्रमांक. 7709596026, (मेडिकल डायरेक्टर) -डॉक्टर भावेश पाटील- भ्रमणध्वनी क्रमांक 9987442573,(चेअरमन)-श्री. सलीम करंजीकर, व इनरव्हील क्लब ऑफ पालघर (अध्यक्ष)- नियती उलकंदे, (सचिव)-संपदा काशीकर, (डायरेक्टर)-नीता डांगे, (चेअरमन)-मंजुश्री पाटील- भ्रमणध्वनी क्रमांक- 9823238907 यांच्या वतीने करण्यात आले असून
अधिक माहितीसाठी वरील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच मंगळवार दिनांक 21 मार्च 2023 रोजी याच शिबिराच्या ठिकाणी पोदार शासकीय वैद्यक विद्यालय वरळी मुंबई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.



