राष्ट्रीय बुद्धिबळ पंच परीक्षेत अभिजीत बावळे यांचे यश

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
ऑल इंडिया चेस फेडरेशन (अर्बिटर कमिशन), महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि पुणे डिस्ट्रिक्ट चेस सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने सीनियर नॅशनल ऑर्बिटर ( राष्ट्रीय बुद्धिबळ पंच) परीक्षा चे आयोजन दिनांक 4 व 5 मार्च रोजी पुणे येथे करण्यात आले होते.
अत्यंत क्लिष्ट व खडतर समजल्या जाणाऱ्या या पंच परीक्षेत अभिजीत बावळे हे A श्रेणी मधून पास झाले आहेत . त्यांनी हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रीय पंच तयार झाल्यामुळे ग्रामीण भागातील बुद्धिबळ खेळायला चालना मिळणार आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक . जयसिंह मोहिते पाटील, संस्थाध्यक्ष . संग्राम सिंह मोहिते पाटील, संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.
अभिजीत बावळे हे सध्या महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या ठिकाणी कार्यरत असून त्यांच्या यशाबद्दल प्रशाला समिती सभापती ॲड. नितीन राव खराडे, प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर व समिती सदस्य अनिल जाधव सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



