पालघर जिल्ह्यातील डहाणू सेंट मेरी हायस्कूलचा जनक देवरे हा विद्यार्थी स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक. 7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप)) परीक्षेमध्ये इयत्ता 8 वी मध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सेंट मेरीज हायस्कूलचा विद्यार्थी जनक सुनील देवरे यांनी या परीक्षेमध्ये 97.3154 गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावला आहे.

डहाणू येथील सेंट मेरी हायस्कूलचा विद्यार्थी जनक सुनील देवरे हा इयत्ता पहिली पासून स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतो. 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये त्यांने 97.3154 टक्के गुण मिळवून या परीक्षेमध्ये यश प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून सर्व प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल 13 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जाहीर केला आहे.

या स्कॉलरशिप परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 532876 विद्यार्थी बसले होते.जनक देवरे या विद्यार्थ्यांने इयत्ता 8 वी च्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून सर्वप्रथम क्रमांक पटकावल्यामुळे जनक देवरे सह त्याची शाळा सेंट मेरीज हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सिरील सर, पर्यवेक्षिका नीता वास शिक्षक वर्ग व त्याच्या आईवडिलांचे संपूर्ण पालघर जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे.



