कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त मोफत भव्य आरोग्यतपासणी शिबिर व व विविध कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
जागतिक महिला दिनानिमित्त कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टी व आयुष ग्राम जिंती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले, जवळजवळ 195 महिलांनी लाभ घेतला. कृष्णाई इंटरनॅशनल स्कूल येथील शिबिराअंतर्गत महिलांची रक्ततपासणी, नेत्र तपासणी, सौंदर्य चिकित्सा ,
स्नेहन-स्वेदन (कंबर व गुडघेदुखी साठी वाफ देणे),योग व मार्गदर्शन आदी तपासण्या करण्यात आल्या.

डॉ. श्री बाबासाहेब गाढवे व डॉ. हेमंत येवगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व टीमने उत्कृष्ट मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये डॉ. सोनाली पवार व डॉ. पूनम पवार यांनी महिलांची तपासणी करून त्यांच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन केले. सौ. कोमल शेलार यांनी महिलांना योगाचे प्रकार शिकवले तर डॉ.सौ. साके मॅडम यांनी सौंदर्य आणि आयुर्वेद चिकित्सा या संदर्भात मार्गदर्शन केले.तसेच आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांनी देखील उत्तम प्रकारे सहकार्य केल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना या आरोग्य शिबिराचा खूप फायदा झाला.

तसेच कृष्णाई स्कूल मध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.यावेळी महिलांसाठी पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा यांचे आयोजन करून नंबर आलेल्या महिलांना लगेच बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध फनी गेम्स घेण्यात आल्या..फनी गेम्स मध्ये तळ्यात मळ्यात, उखाणे, हुमाणे, प्रश्नउत्तर असे घेण्यात आले. कृष्णाई स्कूल मधील विद्यार्थ्यांनी महिलांसाठी खाऊगल्ली भरवलेली त्यामुळे महिलांनी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा. श्री. तानाजीराव करचे सर,व आदरणीय हेमलता करचे मॅडम, रेणुका करचे मॅडम उपस्थित होत्या.सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून उत्तम पद्धतीने राबविणाऱ्या कृष्णाई स्कूल च्या प्राचार्य. स्मिता पाटील मॅडम,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय शिंदे सर, सोनाली पाडुळे मॅडम, अनुराधा आटपाटकर,अमरजित करचे यांनी केले. तसेच एकाच दिवशी एवढ्या कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन करणारा कृष्णाई स्कूल चा सर्व स्टाफ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.



