पालघर जिल्ह्यातील सफाळे रोडखड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थाना योग प्रशिक्षणाचे धडे

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्वे रोडखड जिल्हा परिषदेच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ मुंबई ( मकाबो) यांच्या माध्यमातून शनिवार 03 मे 2025 रोजी शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ मुंबई (मकाबो) च्या अध्यक्षा शुभदा मांजरेकर, सनदी अध्यक्ष संजय अग्रवाल, सोनल दोशी, योग प्रशिक्षक मीनल भिर्द, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गिरीधर, उपाध्यक्ष नीलम घरत तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग प्रशिक्षक मीनल मर्द यांनी मुलांना सुलभ मार्गाने योग कसे करावे यावर याविषयी खूप चांगले असे मार्गदर्शन केले. योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
संजय अग्रवाल यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली. तसेच टोमॅटो केचअपच्या बॉटल्या व अंगणवाडीतील मुलांना खेळण्यासाठी विविध गेम दिले.
शाळेतील मुलांनी देखील पारंपारिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सर्व पाहुण्यांचे स्वागत शालेय नर्सरी मधील कापूर, तुळस व बागेतील पुष्प देऊन करण्यात आले.



