महाराष्ट्र

उमरड ते विहाळ रस्त्यावरील उमरड हद्दीतील ओढ्यावर तत्काळ पूल बांधा अन्यथा आंदोलन करणार – राजाभाऊ कदम यांनी दिला शासनाला सज्जड इशारा

करमाळा प्रतिनिधी: आलिम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

उमरड ते विहाळ मार्गावर उमरड हद्दीमध्ये ओढ्यावरती तत्काळ पूल बांधावा सदरचा पूल त्वरित बांधावा अन्यथा आंदोलन करू असा सज्जड इशारा बहुजन संघर्ष सेना चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी एका निवेदनाद्वारे करमाळा तहसीलदार यांना दिला आहे

निवेदनात पुढे असे म्हटले आहे की ओढ्याच्या उत्तर दिशेला 100 वस्त्या आहेत साधारणपणे या वस्त्यांमध्ये 500 नागरिक राहतात नागरिक याच रस्त्यावरून ये जा करतात ओढ्यामध्ये तीन फूट पाणी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची गैरसोय होते विद्यार्थ्यांना शाळेत जाणे बंद झाले आहे स्त्रियांना पाण्यातून जाता येत नाही मोटार सायकल पाण्यातून येत नाही त्यामुळे लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे

जिल्हा परिषद बांधकाम खात्याने तत्काळ जाण्या-येण्यापुरता सिमेंटच्या नळ्या टाकून तात्पुरत्या स्वरूपात का होईना पुलाची व्यवस्था करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले या मागणीचे निवेदन बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी जिल्हाधिकारी सोलापूर व जिल्हा परिषद मुख्य अधिकारी सोलापूर यांना नायब तहसीलदार विजय लोकरे करमाळा यांच्यामार्फत दिले लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात पूल बांधण्याची व्यवस्था करावी अन्यथा बहुजन संघर्ष सेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा सज्जन इशारा बहुजन संघर्ष सेना चे सोलापूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे

यावेळी माजी सरपंच संदीप मारकड, अशोक रामा बदे, इंद्रजीत हनुमंत बदे, परशुराम साहेबराव बदे, शांतीलाल कांतीलाल कोठावळे, किरण देविदास बदे, गोवर्धन दादा कोठावळे, इरफान शेख, इसाक शेख, शंकर लोखंडे, ज्ञानेश्वर बदे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button