सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका सुविधा केंद्रास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ चे महाराष्ट्र शासन व तंत्रशिक्षण मंडळ , मुंबई अधिकृत सुविधा केंद्र ( FC Center ) दि . ०१/०६/२०२३ पासून सुरू झाले आहे . महाविद्यालयाच्या सुविधा केंद्रास तसेच पदविका प्रवेशास अकलूज व परीसरातील पालक व विद्यार्थ्यांचा मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . सुविधा केंद्र सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.३० यावेळेमध्ये सर्व दिवशी चालू आहे .
महाविद्यालयाच्या सुविधा केंद्राचा नंबर FC ६७८२ असा असून सुविधा केंद्रामध्ये प्रथम तसेच थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांसाठी विद्यार्थ्यांची नाव नोंदणी, अर्ज नोंदणी व निश्चिती केली जात असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी दिली .

महाविद्यालयामध्ये पदविका अभियांत्रिकीच्या सिव्हील इंजिनिअरींग ( Choice Code 678219110 ) , कॉम्प्युटर इंजिनिअरींग ( Choice Code 678224510 ) . इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग ( Choice Code 678229310 ) व मेकॅनिकल इंजिनिअरींग ( Choice Code – 678261210 ) या शाखा उपलब्ध आहेत . सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय हे पदविका अभियांत्रिकी शिक्षणासोबतच विद्यार्थी उद्योजकता मार्गदर्शन व पाठपुरावा याची सुविधा उपलब्ध करून देणारे सोलापूर जिल्हयातील एकमेव महाविद्यालय आहे . तरी अकलूज व परिसरातील पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सहकार महर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेशासाठी प्रथम पसंतीक्रम देवून आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . प्रविण ढवळे यांनी केलेले आहे .
डॉ . प्रविण ढवळे
प्राचार्य सहकार महर्षी शंकरराव माहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड रिसर्च , शंकरनगर – अकलूज .



