पिंपरी बुद्रुकचे ग्रामदैवत पिरसाहेब यांचा उरूस सोमवारपासून

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी, मोबा. 8378076123
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा उरुस सोमवार १३ मार्च ते बुधवार १५ मार्च दरम्यान होणार आहे. पीरसाहेब उरुस कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
पिंपरी बुद्रुक पंचक्रोशीतील भाविकांचे ग्रामदैवत पीरसाहेब (उदगीरबाबा) यांचा संदल सोमवार १३ मार्च रोजी रात्री ९ वाजता वाजत गाजत मजारवर चढवण्यात येणार आहे. तर मंगळवार १४ मार्च रोजी मुख्य उरूस भरणार आहे. या वेळी खाद्यपदार्थ, विविध वस्तूंचे स्टॉल उभारले जातात, त्यामूळे खरेदी करण्यासाठीही गर्दी होत असते.
देवाच्या मानाच्या घोड्यांची मिरवणूक (छबीना) सायंकाळी सात वाजता फटाक्यांच्या आतषबाजी करत तसेच लेझीम, हलगीच्या निनादात काढण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता पायल सावंत सोबत विशाल सावंत गोतोंडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ यांचा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार १५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी मुकाबला होणार आहे. त्यानंतर सायंकाळी प्रार्थना करून उरुसाची सांगता करण्यात येणार आहे.



