शहर

पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके दातीवारे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना नवीन कायदे आणि डायल 112 विषयी सविस्तर माहिती देताना….

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून पालघर जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद अभियाना अंतर्गत केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता. के. शेळके यांच्या केळवा रोड विभाग पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील दातिवरे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना नवीन कायदे व वाढते सायबर गुन्हे तसेच बचाव व डायल 112 यांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी बुधवार दिनांक 10 जुलै रोजी दातीवरे हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी दिली.


पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबवले जात आहे. या अभियाना अंतर्गत पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील दातीवरे हायस्कूल येथील आठवी ते दहावीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या नवीन कायदे विषयक सविस्तर माहिती देऊन पालघर जिल्ह्यातील अपघाताचे वाढते प्रमाण कमी कसे करता येईल यासाठी रस्त्याने चालताना किंवा समोरून येणाऱ्या वाहनांपासून आपले संरक्षण कसे करावे व आपल्या कुटुंबाची काळजी कशी घ्यावी तसेच घरातील वडीलधाऱ्या माणसांना हेल्मेटचा वापर करावा सांगावे याचबरोबर वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन करून मोबाईलचा अतिवापर व्हाट्सअप यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून वाढणारे सायबर गुन्हे या विषयी माहिती देऊन डायल 112 विषयी माहिती देण्यात आली यावेळी दातीवारे हायस्कूल शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button