महाराष्ट्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी घारगाव येथील ग्रामस्थांनी केली राजकीय नेत्यांना गावबंदी

करमाळा प्रतिनिधी आलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील घारगाव येथे सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाचा ठराव करण्यात आला असून या ठरावाची प्रत तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. याशिवाय करमाळा तहसील कार्यालयासमोर सुरु असलेल्या साखळी उपोषणालाही पाठींबा देण्यात आला आहे. यावेळी घारगाव येथील मराठा समाज बांधव, धनगर समाज बांधव व बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण जाहीर होईपर्यंत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गावातील सर्व समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गावातील सर्व समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. करमाळा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावातील समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावामध्ये नेत्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे ठराव केले जात आहेत. याशिवाय साखळी उपोषणातही सहभागी होऊन रोज हजारो बांधव पाठींबा देत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button